मान्सूनची जोरदार मुसंडी : 31 मे रोजी केरळात दाखल होणार

तळकोकणात ८ ते १० जून दरम्यान होणार आगमन
मान्सूनची जोरदार मुसंडी : 31 मे रोजी केरळात दाखल होणार

पुणे (प्रतिनिधि) - मान्सूनने शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर वेळेवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुसंडी मारली आहे. मॉन्सूनने संपुर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह व्यापला असून, श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असून तळकोकणात ८ ते १० जून दरम्यान दाखल होईल. उर्वरित राज्यात १५ ते २० जून पर्यंत येईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टी लगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मान्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. अखेर शुक्रवारी (ता.२१) नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) अंदमानात दमदार आगमन झाले. पुढील ४८ तासांमध्ये अंदमानसह बंगालच्या उपसागराच्या आग्नेय, नैर्ऋत्य भागात मोसमी पावसाची वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात आज (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याचे सोमवार (ता. २४) चक्रीवादळात रुपांतर होऊन ही प्रणाली बुधवारपर्यंत (ता. २६) ओडिशा, पश्चिम बंगाल, बांग्लादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत आहेत. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन मॉन्सूनचा वेगाने प्रवास सुरू झाला आहे.

नैर्ऋत्येकडून येणारे वारे, ढगांची झालेली दाटी, पावसाची हजेरी यामुळे शुक्रवारी (ता. २१) बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपुर्ण अंदमान निकोबार बेटसमुह व्यापून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मजल मारली आहे.

श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचेही हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे आगमनात चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टी लगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मान्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. अखेर शुक्रवारी (ता.२१) नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) अंदमानात दमदार आगमन झाले. पुढील ४८ तासांमध्ये अंदमानसह बंगालच्या उपसागराच्या आग्नेय, नैर्ऋत्य भागात मोसमी पावसाची वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

८ ते १० जून पर्यत महाराष्ट्रात

१ जूनला केरळमध्ये यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून वेळेत दाखल झाला आहे. त्यामुळे १ जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अंदमान-निकोबार आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. केरळनंतर ८ ते १० जूनपर्यंत तळकोकणात मन्सून दाखल होऊ शकतो. १५ ते २० जूनपर्यंत तो महाराष्ट्रात सर्वत्र हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चक्रीवादळामुळे मान्सूनला गती

दरवर्षी १८ ते २० मे पर्यंत मान्सून अंदमानच्या बेटांवर हजेरी लावतो. यंदा २१ मे रोजी तो अंदमानात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, तो खरा ठरला. सध्या बंगालच्या उपसागरात 'यास' नावाचे चक्रीवादळ घोंघावत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com