ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा

मनसे पदाधिकार्‍यांना आदेश
ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा

मुंबई -

राज्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुका महाराष्ट्र निवनिर्माण सेना (मनसे) संपूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.

नांदगावकर यांच्या स्वाक्षरीनं काढलेल्या या निवेदनात म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांना सुचित करण्यात येतं की, आपण आपल्या ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावं.

पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ज्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या संपूर्ण माहितीचा तपशील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला पोस्टाद्वारे आणि ई-मेलद्वारे पाठवावा, असे आवाहनही मनसेकडून करण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com