मुलूंड प्रकरणानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे; खास संदेश देत म्हणाले...

मुलूंड प्रकरणानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे; खास संदेश देत म्हणाले...

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकताच मराठी पाट्यांबद्दलचा (Marathi Signboards) निर्णय दिला. महाराष्ट्रात दोन महिन्यात दुकानांवर सर्वत्र मराठी पाट्या झळकल्या पाहिजे असा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरूद्ध परप्रांतीय हा मुद्दा चर्चेत आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक भूमिका घेत गुजराती पिता- पुत्राला माफी मागायला लावली. दरम्यान मनसेने या प्रकरणावर राज ठाकरे (Caricature Shared By Raj Thackeray) यांचे जुने व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून मराठी माणसाच्या अस्मितेवर भाष्य केल्याचे एक व्यंगचित्र काढले होते. मराठी अस्मिता ही ठिगळं जोडलेली आहे, तिच्यात एकसंधता नाही, अशा आशयाचे हे व्यंगचित्र असल्याचे दिसते. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी आपल्या भावना अस्खलितपणे मांडल्या होत्या. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात तमिळ, पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिलांचे चित्र रेखाटले आहे. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला मात्र ठिगळं असलेली साडी नेसून उभी असल्याचे चित्रण केले आहे.

यासोबत "राजधानी हातातून गेली की राज्य गेले... आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत." असे म्हटले आहे. राज ठाकरेंनी काढलेले हे व्यंगचित्र मनसे अधिकृतने ट्विटरवर शेअर केले आहे. यासोबत त्यांनी मराठी माणूस हा हॅशटॅगही दिला आहे. यातून राज यांच्या मनसैनिकांनी, जातीय भिन्नता विसरून मराठी या नात्याने एकत्र येण्याचा संदेश दिला आहे.

मुलूंड प्रकरणानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे; खास संदेश देत म्हणाले...
Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; 'या' विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

मुलुंडमध्ये तृप्ती देवरूखकर यांनी मुंबईत राहत असूनही इथल्या मराठी लोकांना घरे दिली जात नाहीत, त्यांना जाणूनबुजून डावलले जाते. अशा अनेक घटना रोज घडताना दिसतात असा एक व्हिडीओ शेअर करत आपली व्यथा मांडली होती. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुढे येत संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली होती.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com