मुंबई -

राज्य सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे आता हा निधी 3 कोटी

इतका झाला आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र सरकारने काढले आहेत. स्थानिक विकासासाठी 2011-12 या आर्थिक वर्षापासून आमदारांना 2 कोटी इतका निधी दिला जात होता.

दरम्यान, नव्या आदेशानुसार आता 2020-21 या आर्थिक वर्षापासून 3 कोटी एवढा निधी दिला जाणार आहे. बांधकाम आणि इतर साहित्याच्या दरांमध्ये भाववाढ आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणार्या निधी विचारात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना राबविताना स्थानिक लोकांना उपयुक्त असलेली आणि सहजरित्या पूर्ण होणार्या लहान कामांना आवश्यक असलेला निधी कमी प्रमाणात उपलब्ध होतो. या निधीमधून अनेक कामे करायची असतात. यामध्ये शाळा खोल्या, शौचालये बांधकाम, बंधारे आदी लहान कामांचा समावेश आहे. दरम्यान, भाववाढ झाल्याने या कामांना देखील अधिकचा निधी लागतो. त्याच पार्श्वभूमीवर आता शासनाने आमदारांच्या निधीत 1 कोटींची वाढ करत 3 कोटी एवढा निधी केला आहे.

आर्थिक वर्षे 2020-21 पासून उपलब्ध होणार्या 3 कोटीच्या निधीमधून 10 टक्के म्हणजेच 30.00 लाख राखीव निधी ठेवला जाणार आहे. हा निधी आमदारा स्थिनक विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी करण्यात आलेली कामे किंवा वास्तूंच्या देखभालीसाठी हा राखीव निधी वापरावा लागणार आहे. या राखीव निधीतून राज्य शासनाच्या इतर कार्यक्रम आणि योजनांतर्गत यापूर्वी करण्यात आलेली कामे आणि वास्तूंच्या अतिआवश्यक आणि तातडीची देखभाल व दुरुस्ती करण्याकरीता 10.00 लाखांची निधी विशेष बाब म्हणून दिला जाणार आहे.