पुणे -

बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि जे दोषी होतील त्यांच्यावर

कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करू नये असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. ते पुण्यात बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेच आहे. तसेच सत्य समोर येईलच. पण, पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावरही अन्याय होता कामा नये असेही ते म्हणाले.