‘सरकारला फक्त आदित्य ठाकरे-पार्थ पवारच्या करिअरची चिंता’

एमपीएससी उत्तीर्ण स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या ; भाजप आमदारचा आरोप
‘सरकारला फक्त आदित्य ठाकरे-पार्थ पवारच्या करिअरची चिंता’

मुंबई - एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या स्वप्निल लोणकर या तरूणाने (MPSC pass out candidate Swapnil Lonkar suicide) पुण्यात (Pune) आत्महत्या केल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

‘सरकारला विद्यार्थ्यांचं काही देणंघेणं नाही. सरकारला फक्त आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या करिअरची काळजी आहे. परंतु कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातून एमपीएससी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं त्यांना काही पडलं नाही. स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे’ अशी टीका भाजपा (BJP) आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांनी राज्य सरकारवर केली आहे.

आमदार सातपुते म्हणाले, एमपीएससी ची तयारी करणारे लाखो तरूण परीक्षेची वाट बघत आहेत. वारंवार सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत धोरण सुधारा, तात्काळ परीक्षा द्या असं सांगूनही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार सुधारत नाही.

स्वप्निल लोणकर या तरूणाने जरी आत्महत्या केली असली तरी ती शासनाच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. सरकारचं नाकर्ते धोरण असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. एमपीएससी परीक्षेची वाट पाहतायेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. आज मुलांनी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पीएसआय परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत, त्यांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. परंतु नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत.

‘सरकारला फक्त आदित्य ठाकरे-पार्थ पवारच्या करिअरची चिंता’
तिसर्‍या लाटेचे वास्तव स्वीकारु या!

काय आहे प्रकरण?

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (30 जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या(एमपीएससी) परीक्षेची तयारी करीत होता. तो 2019 च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात करोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे स्वप्निलने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहले आहे.

‘सरकारला फक्त आदित्य ठाकरे-पार्थ पवारच्या करिअरची चिंता’
राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com