ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्र

....तर खाजगी डॉक्टरांवर ‘मेस्मा’क़ारवाई

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

राज्यात करोनाचा संसर्ग वाढतच असून टोकाचे प्रयत्न करूनही सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनो, सेवा देण्यासाठी पुढे या अन्यथा नाईलाजास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला शुक्रवारी दिला आहे. या कायद्यामध्ये डॉक्टरांची नोंदणी रद्द करून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे, असेही ते म्हणाले. रुग्णाला दवाखान्यात जाताक्षणीच उपचार सुरु व्हायलाच पाहिजेत. रुग्णाला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करा. राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आहे, मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे याबद्दलही मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. Maharashtra Essential Services Maintenance Act (MESMA)

खाजगी रुग्णालयात तर बेडच मिळत नाहीत कारण पैसेवाले लोक तिकडे जाणार. सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा हेच केलं पाहिजे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोना सुविधा केंद्र सुरू आहेत. येथे सरकारी फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता आहे. एमबीबीएस गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा 60 हजार रुपये देते तर एमडी गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा दोन लाख रुपये देते. तरीही डॉक्टर यायला तयार नाहीत याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com