MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई | Mumbai

अखेर महाराष्ट्र MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी म्हंटले आहे की, "उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा."

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com