MHT-CET 2022 परीक्षा पुढे ढकलली; कधी होणार परीक्षा?, जाणून घ्या

MHT-CET 2022 परीक्षा पुढे ढकलली; कधी होणार परीक्षा?, जाणून घ्या

मुंबई | Mumbai

महाराष्‍ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2022) पुढे ढकलण्‍यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली आहे (Maharashtra Common Entrance Test new date)

नीट २०२२ (NEET 2022) आणि जेईई मेन्स २०२२ (JEE 2022) परीक्षेमुळे MHT-CET 2022 पुढे ढकलण्यात आली असल्याचं उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे. तसेच ही परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, याबाबतचे संकेत देखील मंत्र्यांनी आपल्या ट्विटमधून दिले आहे. परीक्षाबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं आहे. (MHT CET 2022 Exam Dates)

दरम्यान JEE, NEET आणि CET परीक्षा एकाच दिवशी असू नयेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. त्‍यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्‍यात आल्‍याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com