म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर; सुधारित वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर; सुधारित वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

मुंबई | Mumbai

पीएसआय (PSI) या पदाची मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी आहे आणि त्याचदिवशी म्हाडाचेदेखील (Mhada) पेपर (Paper) सुरू होणार आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता होती...

यामुळे विद्यार्थ्यांच्या वतीने ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. ही विनंती आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मान्य करत परीक्षेच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. २९ व ३० जानेवारीला एमपीएससीची (MPSC) परीक्षा असल्यामुळे म्हाडाने त्या दिवसांची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून म्हाडाच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com