मुंबईसह "या" जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र

मुंबईसह "या" जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने मुंबई व उपनगरात जोरदार ते अतीजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. रात्रीपासून कोकणसह मुंबईतील काही भागांत जोराचा पाऊस कोसळत आहे.

मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत सध्या पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर शहरात दुपारी भरतीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान समुद्रात ४.५१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात समुद्रात न जाण्याचा सावधनतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबई सह अनेक उपनगरात पाणी साचले असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर देखील झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com