
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच कडाक्याची थंडी पडली आहे. आता राज्यात पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.....
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज (दि. 27) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.