
मुंबई | Mumbai
मागील चार दिवसांपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा राज्यातील काही भागात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. मागील काही तासांसापून मुंबई (Mumbai) आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. तसेच दादर, रावळी कँप यासह अन्य भागात पावसाने हजेरी लावली आहे....
आज आणि उद्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
तसेच 27 सप्टेंबरपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
आज अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.