लहान मुलांच्या विशेष कक्षासाठी वैद्यकीय सज्जता

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
लहान मुलांच्या विशेष कक्षासाठी वैद्यकीय सज्जता

मुंबई । प्रतिनिधी

करोनाची तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा लहान मुलांना धोका आहे असे सांगण्यात येते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करावेत. त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा आणि औषधांची यादी वैद्यकीय शिक्षण संचलनालयाकडे त्वरीत पाठवण्यात यावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिले.

करोनाच्या संभाव्य तिसरा लाटेचा धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बालरोग शास्त्र विभागातील प्राध्यापक तसेच विभागप्रमुखांसोबत अमित देशमुख यांनी व्हीसीव्दारे बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र प्रमुख उपस्थित होते.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या लहान मुलांवरील करण्यात येणारे उपचार, समुपदेशन(कौन्सिलिंग) यावर भर देताना लहान मुलांच्या पालकांचेही समुपदेशन करावे. त्यामुळे रुग्णालयातून लहान मुले घरी घेल्यानंतर त्यांना कोणताही त्रास होणार नाही. येणाऱ्या काळात शासकीय रुग्णालयांत टेली काउन्सिलिंग आणि हेल्पलाइन सुविधा निर्माण कराव्यात, अशी सूचनाही अमित देशमुख यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com