
मुंबई | Mumbai
वसईच्या वाकीपाडा येथील इंडूजा कंपनीत मोठा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीत बॉयलरचा स्फोट (Boiler explosion) झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे...
हा स्फोट इतका भयंकर होता की यामुळे संपूर्ण परिसराला मोठा हादरा बसला. सुमारे एक किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
स्फोटानंतर धुराचे मोठमोठे लोळ आकाशात जाताना दिसत होते. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशन दलाचे (Fire Brigade) जवान, पोलीस (Police) घटनास्थळी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.
दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.