षड्यंत्र उघड! 'त्या' नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड

षड्यंत्र उघड! 'त्या' नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड

सांगली | Sangli

काही दिवसांपूर्वी सांगली येथील मिरज (Miraj) तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. मात्र पोलीस तपासात (Police investigation) ही आत्महत्या नसून हत्या (Murder) असल्याचे निषन्न झाले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसाळ येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह मिळून आले होते. या कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

षड्यंत्र उघड! 'त्या' नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड
धक्कादायक! एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या

मात्र आता या नऊ जणांची जेवणात विषारी पदार्थ मिसळून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतले आहे.

अब्बास महंद बागवान आणि धीर चंद्रकांत सरवशे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

षड्यंत्र उघड! 'त्या' नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड
संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण...

दरम्यान, पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), संगीता पोपट वनमोरे (48), शुभम पोपट वनमोरे (वय 28), अर्चना पोपट वनमोरे (30), रेखा माणिक वनमोरे (वय 45), माणिक यल्लाप्पा वनमोरे (49), अनिता माणिक वनमोरे (वय 28) आदित्य माणिक वनमोरे (15) आणि अक्काताई वनमोरे (72) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com