धक्कादायक! प्रियकराने दगा दिल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

धक्कादायक! प्रियकराने दगा दिल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

नागपूर | Nagpur

नागपूरमधून एक धक्कादायक वृत्त हाती येत आहे. एका विवाहितेने प्रियकराने दगा दिल्यामुळे आत्महत्या (Suicide) केल्याची घटना कोराडीत उघडकीस आली आहे. करिना (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपूर्वी करिना हिचे लग्न झाले. तिचा पती खासगी कंपनीत नोकरीवर आहे. तर फावल्या वेळात एका पिझ्झा कंपनीसाठी काम करतो. कामाच्या व्यस्ततेमुळे तो तिला वेळ देत नव्हता.

त्यामुळे घरात एकट्या राहणाऱ्या करिनाचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी प्रेमसंबंध झाले. त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिला तीन वर्षाचा मुलगा असल्याने ती घर सोडू शकत नव्हती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

धक्कादायक! प्रियकराने दगा दिल्यामुळे विवाहितेची आत्महत्या
पंतप्रधानांचे बंधू प्रह्लाद मोदी रुग्णालयात दाखल

दोघांच्या प्रेमाबाबत पतीला समजल्यावर त्याने पत्नीला फटकारले. मात्र तिने प्रियकरासाठी पतीला सोडण्याची मनाची तयारी केली. प्रियकराने वेळेवर दगा दिला.

धक्कादायक! प्रियकराने दगा दिल्यामुळे विवाहितेची आत्महत्या
Elon Musk अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा टॉपला; अदानी किती नंबरला?

त्यामुळे विचाराच्या गर्तेत सापडलेली महिला तणावात होती. रविवारी दुपारी तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com