Video : Maratha Reservation : संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात मूक आंदोलनाला सुरुवात

आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची हजेरी
Video : Maratha Reservation : संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात मूक आंदोलनाला सुरुवात

कोल्हापूर | Kolhapur

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे.

राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे.

सुरुवातीपासूनच आंदोलन न करण्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची तलवार उपसली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. हे मूक आंदोलन असणार असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं.

आज पहिलं आंदोलन होत असून, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. मूक आंदोलनात लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार) भूमिका मांडणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com