मराठा आरक्षण : ‘या’ तारखेला सुनावणी, स्थगिती उठणार?

सुप्रीम कोर्टात दोन अर्ज
मराठा आरक्षण : ‘या’ तारखेला सुनावणी, स्थगिती उठणार?

मुंबई -

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार? हा प्रश्न कायम आहे. याप्रकरणी

27 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी ठाकरे सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर 27 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार याचा निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 27 ऑक्टोबरला होणार आहे. ज्या पीठाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती त्याच पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात खंडपीठात न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्या. अजय रस्तोगी, न्या. हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. या सुनावणी दरम्यान काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com