मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
महाराष्ट्र

मराठा आरक्षण; नेमणुकांना स्थागिती

प्रत्यक्षात होणार सुनावणी

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

मराठा आरक्षणासंदर्भात साेमवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला धक्का बसला. या प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या सुनावणीत पुढील आदेशापर्यंत नेमणुकांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात तीन दिवसात दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी दीड-दीड दिवसांचा अवधी देण्यात आला होता. आता १ सप्टेंबरला september व्हिडीओ कॉन्फरन्सिंग video conferencing ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करा, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार २५ ऑगस्ट august रोजी निर्णय होणार आहे. जर तसा निर्णय झाला तर १ सप्टेंबरला September ही सुनावणी होणार नाही, ती नव्या तारखेनुसार ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

काय आहे प्रकरण

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला हाेता. मात्र, या निर्णयामुळे आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असून हे नियमबाह्य आहे, असा दावा करत हे आरक्षण रद्द करण्याची मागणी काही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com