Maratha Reservation : पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र वाटप करायला उद्यापासून सुरुवात; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Maratha Reservation : पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र वाटप करायला उद्यापासून सुरुवात; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई | Mumbai

सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही, असे म्हणत टिकणार आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे.

तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदत त्यांनी घोषणा केली आहे.

माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने अहवाल सविस्तर सादर केला. उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली . शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. समितीने १ कोटी ७२ लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात ११ हजार ५३० नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com