Maratha Andolan : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल
जालना | Jalana
मराठा समाजाचे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यातील बोलणीतून अद्याप तोडगा निघालेला नसताना दुसरीकडे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनामुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारसमोरील अडचण पुन्हा वाढली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकादा चांगलाच पेटला आहे. या साठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला मागे घेण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या उपषोणाचा आज ९वा दिवस असून मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने. वैद्यकीय पथक उपोषनस्थळी दाखल झालं आहे. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पतळी कमी झाल्याने आज त्यांना सलाइन लावण्यात आले.