बाळूमामांचे वंशज म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला अखेर बेड्या

बाळूमामांचे वंशज म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला अखेर बेड्या

पुणे(प्रतिनिधि)

स्वत:ला बाळूमामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्या विरोधात बारामतीत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर मनोहर भोसलेला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनोहर मामा भोसले हा मूळचा रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूरचा.

पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यात ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस अटकेची कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र नरबळी कायद्यासह इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा, औषध चमत्कारी उपाय करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाच्या आधारे पोलिसांनी वरील संशयित आरोपी मनोहर मामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध कारवाई केली.

दरम्यान मनोहर मामा भोसले याच्यावर पहिल्यांदा बारामतीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी ते पुण्यात आला व त्याच्या वकिलांसोबत त्यांनी पत्रकार परिषेद देखील घेतली होती. यावेळी तो म्हणाला कि,’मी बाळूमामा यांचा वंशज नाही. मी त्यांचा भक्त आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com