मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील एकाला अटक

मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नाही म्हणून धमकीचा मेल
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील एकाला अटक

पुणे (प्रतिनिधि) - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. शैलेश शिंदेंला पुणे पोलिसांनी काल अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी शिंदे यांनी मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन न मिळाल्याने आणि वारंवार पुण्यातील हॅचिंग्स या शाळेकडून त्रास होत असल्याने त्यांनी धमकीचा मेल पाठविल्याचेही कुटुंबाकडून सांगण्यात येतं आहे. दरम्यान, शैलेश शिंदे हा आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे.

मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नाही म्हणून शिंदेंनी गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळी ईमेल मिळाल्यानंतर तातडीची पावलं उचलत पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. शिंदे हे पुण्यातील घोरपडीच्या बि.टी.कवडे रोड परिसरातील इस्टर्न कोर्ट या इमारतीत राहतात. ते सध्या शहरात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करताय. शिंदे यांचा मुलगा पाचवी पासून हाचिंग्स या शाळेत शिकत होता. आता तो दहावीत आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष हॅचिंग शाळेने वाया घालवले, आम्हाला न्याय मिळत नाही, असा दावा आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे.

शैलेश शिंदे यांचा मुलगा पुण्यातील वानवडी परिसरातील हॅचिंग्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतो आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन फी आणि इतर मुद्दयावर त्यांच्या मुलाला देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक, शिक्षणमंत्री यांना तब्बल 150 ई-मेल केले होते. मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचं शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे.

“आम्हाला न्याय नाही मिळाला, म्हणून हा पेपर बाँम्ब आहे. निदान आता तरी सरकार आम्हाला न्याय देईल किंवा देईल की नाही माहिती नाही. आम्ही शिक्षण विभाग, मुख्यमंत्री कार्यालय आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांना पत्र पाठवली, ईमेल केले, मात्र तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. मुलांना नापास करण्यात आलं. आमच्या मुलांना शिक्षणापासून हॅचिंग शाळेने वंचित ठेवलं” असा आरोप संतोष पोलकमवार यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com