राज्यातील मल्टिप्लेक्स थिएटर्स 'या' तारखेपासून सुरु होणार

राज्यातील मल्टिप्लेक्स थिएटर्स 'या' तारखेपासून सुरु होणार

मुंबई | Mumbai

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याची माहिती मिळत आहे.

आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील अनेक ज्येष्ठ कलाकार त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले. तसंच थिएटर चालक, मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांची मागणीही विचारात घेतली गेली नाही. यामुळे सध्या वाद सुरु झाला. देशातील इतर राज्यांमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन थिएटर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही थिएटर्स सुरु कऱण्याची मागणी केली जात होती.

Related Stories

No stories found.