महाविकास आघाडीचा मेळावा 15 रोजी मुक्ताईनगरात
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा मेळावा 15 रोजी मुक्ताईनगरात

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर पहिाला मेळावा शनिवार 15 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगरात होत आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

या तिन्ही नेत्यांचे अधिकृत दौरे प्राप्त झालेले नसले तरी, प्रशासनाकडून मात्र मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे.

विधानसभा निवडणूकीत भाजपाचे माततबर नते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुलगी अ‍ॅड. रोहीणी खडसे यांचा पराभव करून निवडूण आलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्याला महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे प्रमूख नेते उपस्थित राहणार असल्याने तिनही पक्षांकडून मेळाव्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान प्रशासनाकडे या तिनही नेत्यांचे अधिकृत दौरे अद्याप आलेले नाहीत. दरम्यान बुधवारी राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या संभाव्य जिल्हा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेवून दौरा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com