आठ-अ चा उताराही ऑनलाईन
महाराष्ट्र

आठ-अ चा उताराही ऑनलाईन

तलाठी कार्यालयातील हेलपाटे वाचणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाव नमुना 8-अ चा उताराही 8A-App ऑनलाइन मिळणार आहे. या डिजिटल 8 अ‍ॅप सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात revenue minister Balasaheb Thorat यांच्या हस्ते करण्यात आला. 8A document

नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्वाक्षरीत आठ अ खाते उतारा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी-विक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील आवश्यकत असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठ्यांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी डिजिटल 7/12 घेतला आह़े. 7/12 document त्याचप्रमाणे आता डिजिटल 8 अ‍ॅपलासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com