केरळ विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने गमावले प्राण !
महाराष्ट्र

केरळ विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने गमावले प्राण !

वायुसेनेकडून दिला जाणार अतिशय मानाचा 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

केरळमधील कोझिकोड येथे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात महाराष्ट्राचे सुपुत्र पायलट दीपक वसंत साठे यांचाही मृत्यू झाला आहे.

पायलट दीपक वसंत साठे हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर या हुद्यावर कार्यरत असताना साठे यांचा निष्णात लढाऊ वैमानिक म्हणून लौकिक होता. वायुसेनेकडून दिला जाणार अतिशय मानाचा स्वॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच हवाईदलाच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना गौरवण्यात देखील आले होते. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे टेस्ट पायलट म्हणून देखील ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर एअर इंडियाच्या सेवेत रुजू झाले.

दुबईवरून त्यांच्या अधिपत्याखाली उड्डाण घेतलेले हे विमान वंदे भारत मिशन अंतर्गत करोना संसर्ग परिस्थितीत आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत घेऊन येण्याच्या मोहिमेवर होते. हे विमान जमिनीवर उतरविण्यात येत असताना दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेत कॅप्टन दीपक साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी कॅप्टन दीपक यांनी पूर्ण प्रयत्न केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com