दिलासा : राज्याचा रिकव्हरी रेट 92.51 टक्के

मृत्यूदर 1.59 टक्के
दिलासा : राज्याचा रिकव्हरी रेट 92.51 टक्के

मुंबई - आज राज्यात 42 हजार 320 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 92.51 टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 22 हजार 122 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज 361 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के इतका आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 56 लाख 2 हजार 19 जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात 27 लाख 29 हजार 301 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 24 हजार 932 जणं संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 3 लाख 27 हजार 580 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com