पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

राज्यात बदल्यांबाबत विरोधकांकडून आरोप
पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

मुंबई

: राज्यात बदल्यांबाबत घोटाळा सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप होत असताना सामान्य प्रशासन विभागाने आज पुन्हा काही सनदी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

हाफकीन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून ए शैला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही बी पाटील यांची नियुक्ती उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. पुण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भुगर्भ जल सर्वेक्षण येथे संचालक असलेल्या कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com