हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने

हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने

मुंबई | Mumbai

उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी (Nagpur) मुंबईत (Mumbai) होतं आहे.

हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच राज्यात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीणीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST workers strike) सुरू आहे. यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या मुद्यांवरुन विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

तसेच ओबीसी आरक्षणाचा (obc reservation) मुद्दादेखील जोरदार चर्चेत आहे. या अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून (obc political reservation) सर्वच पक्ष एकमेकांना भिडणार आहेत. या मुद्द्यावरून राजकीय राडा बघायला मिळू शकतो.

तसेच आरोग्य विभाग (health department exam) असो किंवा म्हाडाची परिक्षा (MHADA Exams) किंवा एमपीएससीची परीक्षा (MPSC exam) या परीक्षांमध्ये सातत्याने घोळ झालेला पाहायला मिळतो. हा मुद्दाही अधिवेशनात गाजणार असल्याची चर्चा सुरू आहे.

तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडीवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सामना रंगणार आहे.

हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने
TET Exam Scam Case : माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक

दरम्यान, बंगळूरु (Bangalore) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. हा मुद्दा महाविकास आघाडी सरकारनं (MVA govt) चांगलाच उचलून धरला आहे. या मुद्यावरुन सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. कारण सध्या कर्नाटकमध्ये (Karnataka) भाजपचे सरकार (BJP Govt) आहे.

तसेच या घटनेबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनीदेखील वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी पडण्याआधीच सत्ताधारी विरोधकांवर भारी पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दुमदुमणार आहे.

हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. २२ ते २८ डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाच दिवसांचे असणार आहे. हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचा उमेदवार देणार आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तर दुसरीकडे कॉंग्रेसही आपला उमेदवार देणार आहे. संग्राम थोपटे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन : 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने-सामने
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com