मुंबई | Mumbai

गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.

पुढील दोन दिवसांत चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

काल विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पुन्हा गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच या भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय गुरुवारपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, नागपुरमध्ये आज (मंगळवार) पहाटे पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूरकरांनी हलका पाऊस आणि आकाश ढगाळलेले अशी सकाळ अनुभवली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

याचा परिणाम नागपूरसह विदभार्तील अन्य जिल्ह्यावर झाला आहे. त्यामुळे वातावरण ढगाळलेले आहे. वाशिम जिल्ह्यात १५ मिमी, अमरावती येथे ४ तर अकोल्यामध्ये ०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.