गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख
महाराष्ट्र

सुरक्षा महामंडळात ‘त्या’ 542 उमेदवारांना नोकरी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 542 उमेदवारांना नोकरी देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. Maharashtra State Security Corporation

महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या 2014 व 16 या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झालेे होते. मात्र त्यापैकी 542 जणांनी नेमणूक स्वीकारली नाही.

आता या 542 पैकी 55 जणांनी महामंडळाकडे नेमणूक मिळावी याकरिता अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने गृहमंत्री यांच्यासमवेत पोलीस महासंचालक आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वांना महामंडळात नेमणूक देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com