राज्याने गाठला ५ कोटी लस मात्रांचा टप्पा

राज्याने गाठला ५ कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबई | प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेत सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण मात्रांची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभऱात उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) पाठोपाठ महाराष्ट्राने (Maharashtra) ही विक्रमी कामगिरी केली आहे...

१४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com