
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी बारावीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पुरवणी परीक्षांचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
असा तपासा तुमचा निकाल
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतो. या वेबसाइटवर maharesult.nic.in. विद्यार्थी निकाल तपासू शकणार आहेत.
'या' तारखेपासून मिळणार उत्तरपत्रिका
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर ०३ सप्टेंबर २०२२ पासून गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकेची प्रत मिळण्यास सुरूवात होईल. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून यासाठी अर्ज करू शकतात.