अस्सल हापूस आंबा खरेदी करा ‘ऑनलाईन’

राज्य कृषी पणन मंडळाचा आंबा महोत्सव सुरु
अस्सल हापूस आंबा खरेदी करा ‘ऑनलाईन’
रत्नागिरी हापूस आंबा

मुंबई -

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा लॉकडाऊनच्या काळातही ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने https://bs.msamb.com/ हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. अशी माहिती मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी रविवारी दिली.

पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव ऑनलाईन होणार आहे.

या ऑनलाईन महोत्सवात चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांबरोबरच मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादकही सहभागी झाले आहेत.

आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आंबा विक्री सुरू झाली आहे, असेही सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com