दहावी-बारावीचा निकाल ‘या’ तारखेला

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
दहावी-बारावीचा निकाल ‘या’ तारखेला

मुंबई / Mumbai - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात नेमका कधीपर्यंत जाहीर केला जाणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (school education minister Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे. (Maharashtra SSC, HSC Result 2021)

महाराष्ट्रात बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल.

तसेच जे विद्यार्थ्यी आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी सांगितले होते. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केले जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील. तसेच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

दहावी-बारावीचा निकाल ‘या’ तारखेला
दहावीत ९०% मिळवणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान

निकाल कसा पाहाल ?

इयत्ता 10वीचा निकाल पाहण्यासाठी http://maharesults.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com या संकेतस्थळांना भेट द्या. त्यानंतर संबंधित संकेतस्थळाच्या होमपेजवर SSC Examination Result 2021 या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या स्क्रिनवर नवे पेज उघडेल. त्यावर तुमचा रोल क्रमांक आणि इतर तपशील भरा. समबीट पर्यायावर क्लिक करा. तुमचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल (Maharashtra SSC Result 2021) तुमच्या स्क्रिनवर दिसेल. हा निकाल तुम्ही डाऊनलोड करु शकता. प्रिंटही काढू शकता.

बारावीच्या निकालाचे मूल्यांकन धोरण लवकरच

महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल 2021 (एचएससी निकाल 2021) निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार, यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केले जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील.तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

दहावी-बारावीचा निकाल ‘या’ तारखेला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती (BABRF) २०१९ व २०२० साठी NIRF ची अट रद्द
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com