शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर

इयत्ता पाचवी आणि आठवीचे 6 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षा देणार
शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर

पुणे / Pune - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने (Maharashtra State Council of Examination) येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता 9 ऑगस्टला घेण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनी दिली आहे. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्‍चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात परीक्षा लांबणीवर टाकली गेली होती.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं (maharashtra scholarship exam 2021) आयोजन केलं जातं. मात्र, करोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती. येत्या 8 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. पण आता परीक्षेची तारीख़ बदलून 9 ऑगस्ट करण्यात आली आहे.

राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

Related Stories

No stories found.