मुंबई -

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

होता. त्यानुसार आता राज्यातील ग्रामपंचातींच्या आरक्षणाची सोडत पुढच्या आठ ते दहा दिवसांत घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

आरक्षण आधी जाहीर करण्यात न आल्याने मतदानामध्ये 4 टक्के वाढ दिसून आली आहे असेही ते म्हणाले.

राज्यातील अनेक ग्रामपंचातयींमध्ये सध्या प्रशासक आहे. त्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासनातील अधिकार्यांकडे देण्यात आलेला आहे. एका अधिकार्याकडे चार-पाच ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढच्या 8-10 दिवसांत घेऊन गावचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्याची सूचना जिल्ह्याधिकार्यांना दिली आहे. मात्र ग्रामसभा घेण्यास 31 मार्चपर्यंत मनाई असेल अस ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.