राज्यात करोना चाचणी दरात कपात
महाराष्ट्र

राज्यात करोना चाचणी दरात कपात

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रात तिसर्‍यांदा करोना चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली असून यावेळी प्रति तपासणीमागे 300 रूपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या दरानुसार करोना चाचण्यांसाठी 1900, 2200 आणि 2500 रुपये असे जास्तीत जास्त दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra reduces charges for Covid tests

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी करोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी 2200 रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी 2500 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून 2800 रुपये आकारले जात होते. अशा वेळी आता वैयक्तिकरित्या तपासणीसाठी जाणार्‍यांकडून 2800 रुपयांऐवजी 2500 रुपये आकारण्याचे आदेश खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला आहे. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.

असे आहेत नवे दर

नव्या दरानुसार, आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलच्या रिपोर्टींगकरीता 2200 रुपयांऐवजी 1900 रुपये आकारण्यात येतील. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, करोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास 2500 रुपयांऐवजी 2200 आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2500 रुपये सुधारित दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com