
मुंबई । Mumbai
राज्यभरात गेल्या दोन आढवड्यांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रत, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने नद्या, नाले दुथडी भरून वाहतात. गावातील झरे देखील भरून वाहतात.परिणामी, कोल्हापूर, वर्धा, हिंगोली, नांदेड रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून कोकणातील रायगड आणि रत्नागिरीला, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच विदर्भात पावसाचा वेग मंदावला असला तरीही काही भागांत अजूनही पाऊस बरसण्याची शक्यता असून संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. राजधानी मुंबईतील तुरळीत ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस पडला असताना नाशिक नगर जिल्ह्यात मात्र धुव्वाधार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे.