
लातूर| Latur
लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या एका कुटुंबातील तिघांची भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे.
मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या नागोराव किसन टिकणारे (५०), पत्नी रुक्माबा (४५) आणि त्यांचा मुलगा चंद्रकांत (११) यांची भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. मांजरा नदीच्या पुरामुळे अनेक नागरिक अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहेत.