Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याचा नवा अंदाज
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. ह्या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून जे शेतकरी पिकांसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

१९ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

मुंबईत १८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, यवतमाळ, कोल्हापूर, जालन्यात पुढील तीन दिवसांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या किनार पट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत पावसासाठी चांगले चिन्ह दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात, खास करून मराठवाडा व बाजूच्या परिसरात माध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com