
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन रब्बी हंगामाची पिके काढणीस आली असताना, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यातील मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.