राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक; कोल्हापूरला महापुराचा धोका तर रत्नागिरीत बावनदीला पूर

राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक; कोल्हापूरला महापुराचा धोका तर रत्नागिरीत बावनदीला पूर

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Heavy Rain) जोरदार कमबॅक केले असून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.

कोल्हापुरात (Kolhapur rain update) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके (NDRF Team) कोल्हापुरात येत आहेत. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होणार आहेत.

तसेच रत्नागिरीमध्ये (Ratanagiri) अतिवृष्टीमुळे बावनदीला पुर (Bav River) आला असून मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत थांबवली आहे.

कल्याण (kalyan) पूर्व-पश्चिम मधील काही भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी आणि उल्हास नदीच्या (ulhas river) बाजूला असलेल्या परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com