MPSC : महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

MPSC : महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
एमपीएससी

मुंबई | Mumbai

१३ जुलै २०१९ ते १५ जुलै २०१९ या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे.

एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी २०१९ राज्यसेवा परीक्षेतील ४१३ पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.

Related Stories

No stories found.