राज्यात 24 तासांत 300 पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
महाराष्ट्र

राज्यात 24 तासांत 300 पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

बाधितांचा आकडा 12 हजार 290 वर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 303 पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.Maharashtra Police

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता 12 हजार 290 झाली आहे. यामध्ये बरे झालेले 9 हजार 850 जण, सध्या उपचार सुरू असलेले 2 हजार 315 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 125 पोलिसांचा समावेश आहे.

राज्यातील 12 हजार 290 करोनाबाधित पोलिसांमध्ये 1 हजार 277 अधिकारी व 11 हजार 13 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अ‍ॅक्टिव्ह) 2 हजार 315 पोलिसांमध्ये 286 अधिकारी व 2 हजार 29 कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या 9 हजार 850 पोलिसांमध्ये 980 अधिकारी व 8 हजार 870 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 125 पोलिसांमध्ये 11 अधिकारी व 114 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com