मिशन बिगिन अगेन : दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविली

आठवडी बाजार सुरू करण्याचा अधिकार पालिकांना
मिशन बिगिन अगेन : दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविली

मुंबई -

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत नवीन परिपत्रक जारी केले असून यात दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाळी 9 ते रात्री

9 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. 15 ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली होती. आता मात्र, आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, कंटेनमेंट झोन वगळता आठवडी बाजार भरवता येणार आहे. याबद्दलचा निर्णय घेण्यास पालिका प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे.

याशिवाय राज्य सरकारने परिपत्रकात मुंबई लोकल तसंच धार्मिकस्थळांचा उल्लेख केलेला नाही. आजपासून सर्व ग्रंथालये व टप्याटप्याने मुंबईतील मेट्रो सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच कंटनेन्मेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात काही दिवसांपासून ग्रंथालये, मेट्रो, आठवडी बाजार सुरू करावेत यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व ग्रंथालये आपिासून (15 ऑक्टोंबर) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच टप्याटप्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याबाबतची sop लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com