मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलल्या

कधी होणार परीक्षा?
मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलल्या

मुंबई | Mumbai

करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यसह देशभरातील विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यानंतर मेडिकची परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत होती.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमित देशमुख यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. अमित देशमुख यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की, 'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे'.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com