लॉकडाऊन वाढणार?; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान, म्हणाले..

लॉकडाऊन वाढणार?; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान, म्हणाले..

मुंबई | Mumbai

राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन त्यापुढेही वाढवला जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे.

लॉकडाऊन वाढणार?; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान, म्हणाले..
राज्यातील लॉकडाऊन वाढणार का ? आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील लॉकडाऊन पुढे सुरु राहणार की रद्द होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन बाबत बोलतांना, 'कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे', असे सूचक विधान केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुढील काही महिन्यांमध्ये देशात करोनाची तिसरी लाट येईल आणि त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारनं बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्स मधील डॉक्टरांशी त्यांनी आज संवाद साधला.

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले,'पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. ज्यात आपण अनुभवतोय की युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही. करोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे. राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.

तसेच, 'लहान मुलांच्या पालकांनी काळजी करु नये, लहान मुलांची काळजी घेण्यास सरकार समर्थ आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. पालकांनी मुलांवर घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध देऊ नये. त्यांच्यावर अनावश्यक भडिमार करु नये,' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com